मुंबईत पावसाचा जोर वाढणार: हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी .
मुंबईत पावसाचा जोर वाढणार: हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारनंतर जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. बीएमसीने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये असं प्रशासनाने सांगितलं आहे.