PM. किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार ? २००० रुपये खात्यात जमा होणार.
PM किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार? 2000 रुपये खात्यात जमा होणार देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवते. आतापर्यंत 19 हप्ते यशस्वीरित्या आले आहेत. आता सर्वांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 20 वा हप्ता कधी येणार? सरकारच्या माहितीनुसार जून 2026 च्या पहिल्या आठवड्यात 20 वा हप्ता पाठवला जाऊ शकतो. याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर होईल. पैसे आले आहेत का कसे चेक करायचे? स्टेप 1: pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा स्टेप 2: 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करा स्टेप 3: आधार नंबर किंवा बँक खाते नंबर टाका स्टेप 4: 'Get Data' वर क्लिक करा, तुमचा स्टेटस दिसेल महत्वाचे: पैसे मिळण्यासाठी e-KYC आणि जमीन पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे. जर ते झाले नसेल तर लवकर करून घ्या, नाहीतर हप्ता अडकू शकतो.