समृद्धी महामार्गवर दरोडेखोरांचा धुमाकूळ? डॉ धावडे यांचा गंभीर आरोप
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ ? लेखक: डॉ. महेंद्र धावडे, संस्थापक अध्यक्ष, बळीराजा पार्टी समृद्धी महामार्गावर प्रवाशांना गाठून लुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सिन्नर जवळील मलढोण शिवारात महामार्गावर धारदार लोखंडी वस्तू आणि खिळे फेकून, वाहने पंक्चर करण्याचा नवा सापळा लुटारूंनी रचला आहे. एका रात्रीत दरोडेखोरांनी एका नामांकित वकिलाच्या कुटुंबासह दोन ते तीन गाड्यांना लक्ष्य करत तब्बल १८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीतील महिला आणि लहान मुलांना शस्त्रांचा धाक दाखवून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंदाजे २७ तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. वैजापूर जवळ भरदुपारी उद्योजकाला घेरून 1.5 लाखांची चेन लुटली. तर एका व्यापाऱ्याने हवेत गोळीबार करून आपला जीव वाचवला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी बीड जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार किरण गायकवाड सह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. सौजन्य: phuleshahuambedkars.com मागणी: महामार्गावर दर 10 किमी वर पोलीस मदत केंद्र आणि CCTV सुरू करावेत - डॉ. धावडे