पोस्ट्स

पावसाळा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दीपासून बचावाचे 7 घरगुती उपाय | लोकशोधक आरोग्य

इमेज
☔ पावसाळ्यातील आजार आणि बचाव - डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला मान्सून आला की सोबत आजार पण येतात. डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला हे आजार पावसाळ्यात खूप वाढतात. पण थोडी काळजी घेतली तर आपण सहज वाचू शकतो. लोकशोधक साठी खास आरोग्य लेख. 1. डासांपासून बचाव कसा कराल? घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका खिडक्यांना जाळी लावा रात्री झोपताना डासाची कॉइल किंवा मच्छरदाणी वापरा 2. पाणी आणि अन्नाची काळजी फक्त उकळले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या बाहेरचे कापले फळे आणि रस्त्यावरील अन्न टाळा भाज्या मिठाच्या पाण्यात 10 मिनिटे बुडवून ठेवा 3. रोगप्रतिकार शक्ती वाढवा आल्याचा चहा, लिंबू, संत्री आणि हिरव्या पालेभाज्या रोज खा. 7-8 तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे. महत्वाचे: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. - लोकशोधक न्यूज टीम