सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या पक्षपाती परिपत्रकाविरुद्ध LJP रामविलासचा निषेध - मिरा-भायंदर पोलीस ठाण्यात निवेदन
लोक शोधक ब्रेकिंग न्यूज 🔴 BREAKING | मिरा-भायंदर 📅 दिनांक: ११ सप्टेंबर २०२६ | 📍 मिरा-भायंदर / उल्हासनगर प्रतिनिधी सेव्हन स्क्वेअर अकॅडमीने काढलेल्या पक्षपाती परिपत्रकाविरुद्ध LJP रामविलासचा निषेध - पोलिसात निवेदन मिरा-भायंदर: येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेने नुकतेच एक वादग्रस्त परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांच्या टिफिनमध्ये कांदा, बटाटा, लसूण, आले, हळद व इतर कंदमुळे आणण्यास मनाई करण्यात आली आहे. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि समानतेचे संरक्षण करते. एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचे आहार नियम सर्व धर्मीय विद्यार्थ्यांवर सक्तीने लादणे हा गंभीर संवैधानिक प्रश्न असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ⚠️ मुख्य मागणी: विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता पालकांना आपल्या मुलांच्या टिफिनमध्ये कोणते शाकाहारी अन्न द्यावे याचे स्वातंत्र्य असावे. पक्षपाती परिपत्रक त्वरित रद्द करावे. या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी, रामविलास, मिरा-भायंदर च्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२६ ...