पोस्ट्स

शाहरुख खान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शाहरुख खानचा "किंग" चित्रपट लवकरच येणार,पहिला पोस्टर वायरल

शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट लवकरच येणार, पहिलं पोस्टर व्हायरल मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी 'किंग' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झालं आणि काही मिनिटातच व्हायरल झालं. या पोस्टरमध्ये SRK हात बंदूक घेऊन डार्क लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप आवडला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. सूत्रांच्या मते, या चित्रपटात सुहाना खान आणि दीपिका पादुकोण देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'किंग' हा चित्रपट 2026 च्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पोस्टर पाहिल्यावर चाहत्यांनी #KingIsComing हा हॅशटॅग ट्रेंड केला. "SRK चा हा लूक जबरदस्त आहे" अशा कमेंट्स येत आहेत.