पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे ऐतिहासिक नशामुक्त अभियान रॅली - सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन चेंबूर, मुंबई (प्रतिनिधी) - आज पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथे सर्व पक्ष, विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक महिला मंडळ, युवक आणि युवतींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य "नशामुक्त अभियान रॅली" मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीने संपूर्ण चेंबूर परिसर दणाणून सोडला आहे. "नशा मुक्ती झालीच पाहिजे, नशा हद्दपार झालीच पाहिजे" रॅली दरम्यान आंदोलकांनी "नशा मुक्ती झालीच पाहिजे, नशा हद्दपार झालीच पाहिजे, चेंबूर वाचवा, युवा पिढी वाचवा, अमली पदार्थ बंद झालेच पाहिजेत" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हातात फलक, बॅनर घेऊन महिला, युवकांनी या व्यसनाच्या विळख्याविरोधात संताप व्यक्त केला. i गेल्या काही महिन्यांपासून पी.एल. लोखंडे मार्ग, टिळक नगर, चेंबूर कॉलनी परिसरात अमली पदार्थांची विक्री, गांजा, चरस, एमडी सारख्या घातक पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाळा, कॉलेज परिसरात तरुण प...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा