लोक शोधक न्यूज - खारघरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर वैज्ञानिक प्रयोगांसह मार्गदर्शन | तथागत महाविहार | 19 Sep 2026
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
धम्म उपासिका संघ, खारघर (नवी मुंबई) व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खारघर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने
"समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन कसे करावे" या विषयावर विशेष मार्गदर्शन
तथागत महाविहार येथे विद्यार्थी व महिलांना वैज्ञानिक प्रयोगांसह मार्गदर्शन करताना मान्यवर | Photo: लोक शोधक न्यूज,
आज शनिवार, दिनांक १९/०९/२०२६ रोजी वर्षावास मालिका सुत्ता अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात किशोरवयीन मुले, मुली आणि महिला उपासिकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अंधश्रद्धेमागील फसवणूक उघड करताना काही वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले.
🎤 प्रमुख मार्गदर्शक :
१) आयुष्यमान अरविंद सोनटक्के साहेब (से.नि. आयकर आयुक्त)
२) आयुष्यमान अशोक माने साहेब (प्रयोगतज्ञ - अंनिस)
३) डॉ. मधुकर विश्राम आढाव साहेब (प्रमुख वक्ता - अंनिस)
हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळसपणे विचार करायला लावणारा ठरला. उपस्थित मुलांनी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. असा उपक्रम राबविल्याबद्दल धम्म उपासिका संघ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकारी व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
📞 आयोजक संपर्क :
🔹 जितेंद्र बनसोडे - 9326252625 - कार्याध्यक्ष, खारघर शाखा (महा. अंनिस नवी मुंबई)
🔹 दिनेश शिंदे - 9004029303 - प्रधान सचिव, खारघर शाखा (महा. अंनिस नवी मुंबई)
🎤 Lok Shodhak News
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा