नागरिकांना दंड तर लोकप्रतिनिधींना खंड! - डॉ. महेंद्र धावडे यांचा सरकारला सवाल
नागरिकांना दंड तर लोकप्रतिनिधींना खंड! - डॉ. महेंद्र धावडे यांचा सवाल
लोकशोधक न्यूज | मुंबई | 31 ऑगस्ट 2026
मुंबई: इंग्रज गेले पण दंड ठेवून गेले आणि नवीन इंग्रज आले आणि दंड वाढविले मात्र नोकराना माफ अशी आमची अवस्था असल्याची घणाघाती टीका बळीराजा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महेंद्र धावडे यांनी केली आहे.
आमच्या मतावर लोकप्रतिनिधी बनले आणि पेंशन व सुविधा घेऊ लागले मात्र जनता उपाशी नोकर तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली यास आम्हीच जबाबदार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा लेख त्यांनी लोकशोधक न्यूजकडे प्राप्त अर्जानुसार प्रकाशित करण्यासाठी दिला आहे.
नागरिकांवर दंडाचा बडगा
- 🏍️ विना हेल्मेट... दंड 1000/-
- 🅿️ नो पार्किंगमध्ये वाहन पार्क... दंड 3000/-
- 📄 मोटारसायकलचा विमा नाही... दंड 1000/-
- 🍺 मद्यप्राशन करून वाहन चालवणे... दंड 10000/-
- 🚫 नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवणे... दंड 5000/-
- 📱 मोबाईल फोनवर बोलणे... दंड 2000/-
- 💨 प्रदूषण प्रमाणपत्र नाही... दंड 1100/-
- 👥 ट्रिपल सीट... दंड 2000/-
पण प्रशासन जबाबदार नाही का?
- खराब सिग्नल... कोणीही जबाबदार नाही!
- रस्त्यावरील खड्डे... कोणीही जबाबदार नाही!
- अतिक्रमित पदपथ... कोणीही जबाबदार नाही!
- रस्त्यावर उजेड/लाइट नाही... कोणीही जबाबदार नाही!
- रस्त्यांवरील मॅनहोलमध्ये पडून मृत्यू... कोणीही जबाबदार नाही!
- मोकाट जनावरे, कुत्र्यांचा त्रास... कोणीही जबाबदार नाही!
असे वाटते की जनताच एकमेव गुन्हेगार आहे आणि दंड भरण्यास जबाबदार आहे. प्रशासन, महापालिका आणि सरकार कोणीही जबाबदार नाही. रस्ते, पूल वाहून जाऊ लागले तर एक्सप्रेस हायवे खड्ड्यांचे केंद्र झाले मात्र प्रश्न विचारले तर उत्तर देण्याऐवजी FIR दाखल केली जाते.
Tags: डॉ महेंद्र धावडे, बळीराजा पार्टी, नागरिकांना दंड, लोकप्रतिनिधींना खंड, Lokshodhak News, Traffic Fine News
Comments
Post a Comment