लोकशोधक न्यूज - सकाळच्या 9 ताज्या बातम्या | मुंबई, ठाणे, महाराष्ट्र, देश, विदेश - 7 नोव्हेंबर 2026
लोकशोधक न्यूज - सकाळच्या ताज्या बातम्या LOKSHODHAK NEWS PRESS मुंबई • ठाणे • महाराष्ट्र • देश • विदेश - सत्य बातम्या 🔴 ताज्या बातम्या LIVE • मुंबईत पिस्तूल जप्त • ठाण्यात पाणीटंचाई अलर्ट • शरद पवार यांची प्रकृती सुधारली • दिल्लीत प्रदूषण वाढले • शमीची कसोटीतून निवृत्ती • अमेरिकेत मोठा बदल • 🔴 ताज्या बातम्या LIVE शनिवार, 7 नोव्हेंबर 2026 | आजच्या सकाळच्या मोठ्या बातम्या 1 मुंबई - कुर्ल्यात दिवाळीत विक्रीसाठी आणलेले पिस्तूल जप्त कुर्ला पूर्वेतील कुरेशी नगर परिसरात विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्तूल चुनाभट्टी पोलिसांच्या गुंडा पथकाने जप्त केले. याप्रकरणी आदिल अब्दुल अतिक खान (40) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल, तीन मोबाईल फोन आणि ओळखपत्रे हस्तगत केली आहेत. चौकशीत त्याने मुंब्रा बायपास परिसरातून पिस्तूल घेतल्याचे सांगितले. हे पिस्तूल कुर्ल्यातील इफ्लेकार अन्सारी याला विकायचे होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. 📍 मुंबई | क्राईम 2 मुंबईत उकाडा कायम - कुलाबा 36.9°C, हवा मध्यम मुंबईत नोव्हे...