Posts

Showing posts with the label Swachh Bharat Mission

खारघरमध्ये ओल्या कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र संपन्न - हेल्पनेचर आणि इकोव्हिजन फाउंडेशन उपक्रम

Image
कमी कचरा - उद्याचा हिरवा दिवस | Less Waste, Greener Tomorrow ♻️ ओल्या कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र उत्साहात संपन्न खारघर, दि. ३० सप्टेंबर - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हेल्पनेचर आणि इकोव्हिजन सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचरा व्यवस्थापन या विषयावर आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र अतिशय उत्तम रित्या पार पडले. रामधुनाथ विहार, सेक्टर १४, खारघर येथे रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तज्ञ मार्गदर्शकांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण (Reduce, Reuse, Recycle) आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 🌱 इको सायकल :- ओला कचरा → खत (Compost) → माती सुपीक → झाडे वाढ → पर्यावरण रक्षण → Reduce Reuse Recycle यावेळी सोसायटीतील महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 🌿 लोक शोधक न्यूज - पर्यावरणपूरक बातमी 🌿