Posts

Showing posts with the label Aadhar India

कौशल्यविकासातून महिला स्वावलंबनाला बळ; आधार इंडिया केंद्रात प्रशिक्षणासह दांडिया-गरब्याचा उत्साह | डोंबिवली | LOKSHODHAK NEWS PRESS

Image
कौशल्यविकासातून महिला स्वावलंबनाला बळ; आधार इंडिया केंद्रात प्रशिक्षणासह दांडिया-गरब्याचा उत्साह 📍 डोंबिवली | 21 ऑक्टोबर 2026 डोंबिवली: आधार इंडिया राष्ट्रीय कौशल्य केंद्र, डोंबिवली पश्चिम येथे दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी महिलांसाठी कौशल्यविकास व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 💡 अगरबत्ती, धूप, परफ्यूम आणि कोरियन साबणनिर्मितीचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या प्रशिक्षणात महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लागणारे कौशल्य आणि मार्केटिंगचे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले. 💃 नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया-गरबा कार्यक्रमाचे आयोजन - महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 🙏🌺🙏 या उपक्रमाला केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष मा. डॉ. श्री. अमित दुखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सौ. मनिषा कृष्णा सुर्वे तसेच आधार इंडिया संस्थेच्या कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. © LOKSHODHAK NEWS PRESS