राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS

🏆 राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने
डॉ. विजय मोरे यांचा सन्मान 🏆

📍 नवीन पनवेल | 25 ऑक्टोबर 2026




नवीन पनवेल: इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन, एम. व्ही. एस. अनुभूती साहित्य मंच आयोजित "राज्यस्तरीय काव्य संमेलन", "राष्ट्रीय पुरस्कार सोहळा", "अनुभूती गौरव संमेलन" आणि "रंग तरंग साहित्याचे" हा कार्यक्रम रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी आंगण बँकवेट हॉल, सिडको गार्डन शेजारी, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

✨ समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा "राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार" ने सन्मान ✨

🎤 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

प्रमुख पाहुणे - माजी पोलीस महासंचालक श्री. सुधाकर सुराडकर साहेब, श्रीमंत संभाजीराजे जाधवराव (मातृतिर्थ सिंदखेड राजा राजे लखोजी जाधवराव यांचे थेट 14 वे वंशज व स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधव यांचे थेट 10 वे वंशज), संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुरेश भोपी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त मा. रामचंद्र नागरगोजे साहेब, ज्येष्ठ अभिनेत्री व साहित्यिका मेघना साने मॅडम, अनुवृत्तसेवी प्राध्यापक डॉ. ललिता जोगड (1755 जागतिक रेकॉर्ड होल्डर), ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार मा. शशिकांत सावंत साहेब, मा. फिरोज सय्यद (संचालक आय.टी. सोल्युशन), ज्येष्ठ साहित्यिका डॉ. राजश्री बोहरा, डॉ. शैलजा करोडे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

🌟 डॉ. विजय मोरे यांचा गौरव

या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक कवी, गायक डॉ. विजय मोरे यांनी "शाळा शिकून होतो रे ज्ञानी" ही युवकांना प्रेरणादायी अशी कविता सादर केली.

🏅 उत्कृष्ट काव्य सादरीकरणाबद्दल सन्मानचिन्ह
आणि सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल
"राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्कार" ने मान्यवरांच्या हस्ते गौरव 🏅

📸फोटो

(कविता सादर करताना)

📋 आयोजन

या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन ज्येष्ठ समाजसेवक एन.डी. खान साहेब यांचे होते. तर आयोजक सौ. सलमान खान होत्या. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका सौ. अनघा जाधव मॅडम व प्रा. मंगेश महाजन यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दश्री विलास देवळेकर, डॉ. ईसा शेख, डॉ. श्रेयाश्री गोडांबे, श्री विजय भोसले, सौ ऋता भामरे, श्री राजकुमार ताकमोके, श्री एच. एन. पाटील सर, श्री दीपक कदम सर, डॉ. विजय मोरे, सौ मीना ताकमोके, कु. प्रतिभा कीर्तीकर्वे यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

✍️ LOKSHODHAK NEWS PRESS | पनवेल | डॉ. विजय मोरे विशेष

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज