आज 8 ऑक्टोबरच्या 9 ताज्या ठळक बातम्या - ठाणे मुंबई पालघर विरार वसई कल्याण डोंबिवली पनवेल महानगरपालिका लाईव्ह
🔴 आज 8 ऑक्टोबर गुरुवारच्या 9 बातम्या ठाणे मुंबई पालघर विरार वसई कल्याण डोंबिवली पनवेल MMR Live 1) मुंबईत आज दुसऱ्या दिवशी 10% पाणी कपात सुरू :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी - आज 8 ऑक्टोबर रोजी मुंबईत 3 दिवसांच्या 10% पाणी कपातीचा दुसरा दिवस आहे. 7 ते 9 ऑक्टोबर BMC च्या पिसे आणि पंजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात इलेक्ट्रिक मीटर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. दक्षिण मुंबईतील A वॉर्ड कफ परेड नरीमन पॉईंट फोर्ट, B वॉर्ड मोहम्मद अली रोड डोंगरी, E वॉर्ड भायखळा, F दक्षिण परेल आणि F उत्तर माटुंगा, तसेच पूर्व उपनगर कुर्ला विक्रोळी घाटकोपर भांडुप नाहूर कांजूरमार्ग मुलुंड पूर्व पश्चिम भागात पाणी कमी दाबाने येणार आहे. BMC ने पाणी साठवून ठेवा असे आवाहन केले आहे. 2) पनवेल महापालिकेचे मोफत महिला आरोग्य शिबिर आज कळंबोलीत :- पनवेल महानगरपालिकेने 'सेवा संकल्प अभियान 2026' अंतर्गत 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान 4 वॉर्डात मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी Ward A - कालभैरव हॉल कळंबोली येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत शिबिर होणार आहे. यात सांधेदुखी, गुडघेदुखी, हात पाय सुजणे, मुंग्...