Posts

Showing posts with the label Killari Earthquake

30 सप्टेंबर किल्लारी भूकंप दिवस - महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस | डॉ. विजय मोरे

लोक शोधक न्यूज LOKA SHODHAK NEWS - सत्याचा शोध ३० सप्टेंबर किल्लारी भूकंप दिवस - एक भयानक सत्य ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता लातूर आणि उस्मानाबाद (आताचे धाराशिव) जिल्ह्यांत आलेला किल्लारी भूकंप हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत विनाशकारी आणि काळाकुट्ट अध्याय आहे. रिश्टर स्केलवर ६.२ ते ६.४ तीव्रतेच्या या भूकंपाने अवघ्या काही सेकंदांत हसतीखेळती गावे उध्वस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीचे भयानक सत्य म्हणजे सर्व लोक झोपेत असताना हा काळाचा घाला झाला. आदल्या दिवशी २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (गणपती विसर्जन) चा दिवस होता. संपूर्ण गाव गणरायाचे विसर्जन करून रात्री उशिरा गाढ झोपले होते. पहाटे ३:५६ वाजता जेव्हा जमीन हादरली, तेव्हा लोकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. पारंपारिक दगड-मातीची घरे आणि जड छप्पर अंगावर कोसळल्यामुळे हजारो लोक झोपेतच जिवंत गाडले गेले. भयावह आकडेवारी :- - सुमारे ९,७४८ ते १०,००० लोकांचा मृत्यू - ३०,००० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी - १५,८५४ पाळीव जनावरांचा मृत्यू - ५२ गावे पूर्णपणे उद्ध्वस्त तर ३०,००० घरे जमिनदोस्त किल्लारीचा भूकंप हा शास्त्रज्ञांसाठी म...