महाराष्ट्रात पावसाचा कहर! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद | लोकशोधक न्यूज

📰 आजच्या ठळक बातम्या

1. महाराष्ट्रात पावसाचा कहर - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ठप्प

राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात भूस्खलन झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद करण्यात आला. मुंबईत IMD ने रेड अलर्ट जारी केला असून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

2. मुंबईत चॉल कोसळून 6 जणांचा मृत्यू

मुंबईच्या मानखुर्द परिसरात चॉलचा एक भाग कोसळल्याने 6 लोकांचा मृत्यू झाला. बचाव पथक घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचे काम करत आहे.

3. संजय राऊतांचा मोठा दावा - बावनकुळे होणार पुढील CM?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दावा केला की "देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असून चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होतील". यावर बावनकुळे म्हणाले "मुख्यमंत्री होण्याची कुणी घाई करू नये".

4. जेजुरी जवळ भीषण अपघात - 3 वारकऱ्यांचा मृत्यू

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 15 वारकरी जखमी झाले आहेत.

5. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावे वगळली

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून पात्रतेच्या निकषांनुसार तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत.

6. FDA ची मोठी कारवाई - भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपरमधील एका मोठ्या दुग्धालयावर छापा टाकून भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला. दुग्धालयाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS