- Get link
- X
- Other Apps
मंत्रालय संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारत वानखडे यांचा दणदणीत विजय - मंत्रालय जिमखाना संचालक पदाच्या निवडणुकीत!
भिमसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव | मुंबई
मंत्रालयाच्या साक्षीने भररस्त्यातच भिमसैनिकांच्या वतीने भारत वानखडे यांच्यावर अभिनंदन वर्षाव व सत्कार!
✍️ समाजभूषण सो.ना.कांबळे - मुंबई
सदर प्रसंगी मंत्रालया समोरील पादचारी रस्त्यावर मंत्रालयाच्या साक्षीने सेवानिवृत्त बेस्ट कामगार नेते समाजभूषण सो.ना.कांबळे व मंत्रालय शिक्षण विभाग सेवानिवृत्त कामगार नेते एम.के. भालेराव यांनी हस्तांदोलन करून भव्य स्वागत सत्कार केला.
"मी स्वतः जमिनीवरील मंत्रालय राज्य संघटना SC, ST, OBC, NT, VJNT, मागासवर्गीय कर्मचारी वर्गाचा लढाऊ कार्यकर्ता आहे. मला खरा आनंद व चळवळीची ऊर्जा रस्त्यावरील सत्कारातून मिळेल! हे चांगले दिवस मानसन्मानाचे सुटाबुटातील आले ते फक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच! या देशाला सामाजिक समता आणि राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाशिवाय पर्याय नाही." - भारत वानखडे
पुढे वानखडे म्हणाले, "उतायचे किंवा मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही. आपण कोठेही असू पण शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर असू!" असे बोलून भर रस्त्यात आलिंगन देऊन अभिनंदन स्वीकारले. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते असल्याचा संदेश मुंबई मंत्रालय परिसरातून दिला.
वार्तांकन: समाजभूषण सो.ना.कांबळे SEO
सेवानिवृत्त बेस्ट कामगार, माजी चेअरमन दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.
Mo. 970299 2626 | Sona24rpi@gmail.com
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment