Mumbai Thane News Today Live 7 October 2026 - 3 Day Water Cut, Weather Yellow Alert, Navi Mumbai

🔴 आज 7 ऑक्टोबरच्या 9 बातम्या - MMR

Mumbai Thane Kalyan Panvel Navi Mumbai Live - 7 Oct 2026

1) मुंबईत आजपासून 3 दिवस 10% पाणी कपात - आज 7 ते 9 ऑक्टोबर :-
आजपासून मोठी बातमी - BMC ने आज 7 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत 3 दिवस 10% पाणी कपात जाहीर केली आहे. पिसे आणि पंजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात इलेक्ट्रिक मीटर अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. परिणाम - दक्षिण मुंबई A (कफ परेड, नरीमन पॉईंट, फोर्ट), B (मोहम्मद अली रोड, डोंगरी), E (भायखळा), F-दक्षिण (परेल), F-उत्तर (माटुंगा) आणि पूर्व उपनगरात कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, मुलुंड (पूर्व पश्चिम) मध्ये पाणी कमी दाबाने येणार. BMC ने पाणी साठवून ठेवा आणि जपून वापरा असे आवाहन केले आहे.

2) नवी मुंबईत आज रात्री 2 वाजेपर्यंत पाणी बंद - 7 भागात परिणाम :-
नवी मुंबईकरांसाठी पण आज पाणी बंद आहे. काल सकाळी 10 वाजल्यापासून आज 7 ऑक्टोबर रात्री 2 वाजेपर्यंत मेन फीडर पाईपलाईन बंद आहे. भोकरपाडा वॉटर प्लांटचे काम सुरू आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैराणे, घनसोली, ऐरोली या 7 भागात पाणी पुरवठा 16 तास बंद राहणार आहे. NMMC ने टँकरची व्यवस्था केली आहे.

3) आजचे हवामान - गडचिरोलीला यलो अलर्ट, मुंबई कोरडी पण 36 अंश :-
आज 7 ऑक्टोबर रोजी IMD ने विदर्भातील गडचिरोलीला विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटात पण हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीत मुख्यतः कोरडे हवामान राहील पण उकाडा राहील. काल मालेगावात राज्यात सर्वाधिक 38.4 अंश नोंद झाली, जळगाव 37.5, सोलापूर अकोला 37 अंशावर होते. ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू आहे.

4) राज्यात 16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात - उद्योगांना 30% रिसायकल सक्ती :-
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले - 16 ऑक्टोबरपासून सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीत किमान 10% पाणी कपात लागू होणार आहे. धरणात फक्त 75.25% पाणी आहे गतवर्षी 88.82% होते. उद्योगांना 30% पाणी रिसायकल करणे बंधनकारक, गार्डन, बांधकाम, धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरा. पिण्याच्या पाण्याला सर्वात जास्त प्राधान्य, प्रत्येक धरणात 10% इमर्जन्सी बफर ठेवणार. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस मदत घेणार.

5) दिल्लीत भूकंप - उत्तराखंड चमोली 4.9, दिल्ली NCR मध्ये हादरे :-
काल रात्री उत्तराखंड चमोली येथे 4.9 रिश्टरचा भूकंप झाला, त्याचे हादरे दिल्ली NCR पर्यंत जाणवले. दिल्लीत पावसाचा अंदाज 12 ऑक्टोबरपर्यंत नाही, हवा मध्यम आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते पण कोणतीही जीवितहानी नाही.

6) सुप्रीम कोर्टात 3 नवे न्यायाधीश - संख्या 37 झाली :-
आज सकाळची मोठी बातमी - सुप्रीम कोर्टात 3 नव्या न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे एकूण संख्या 37 झाली आहे. तसेच एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची 31 ऑक्टोबरपासून पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे पहिले स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप 'सूर्य' लाँच केले आहे.

7) नवी मुंबई एअरपोर्ट - आजपासून e-Shivai बस सुरू :-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज 7 ऑक्टोबरपासून MSRTC e-Shivai बस सेवा सुरू झाली आहे. दादर 170 रु, बोरिवली 210 रु, पुणे 450 रु. महिलांना आणि 12 वर्षाखालील मुलांना अर्धे भाडे. चाळो बस रोज 21, NMMT चे 7 रूट पण सुरू आहेत.

8) चिपळूणमध्ये आज INDIA आघाडीचा विराट मोर्चा - SIR विरोधात :-
आज 7 ऑक्टोबर रोजी चिपळूणमध्ये SIR प्रक्रियेविरोधात INDIA आघाडीचा विराट मोर्चा निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून मोर्चा प्रांत कार्यालयावर जाणार आहे. भास्कर जाधव यांनी तरुणांना आणि Gen Z ला सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उत्तर रत्नागिरीचे सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी पण आहे.

9) सोन्या-चांदीत घसरण - ग्राहकांना दिलासा :-
आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 24 कॅरेट खरेदीसाठी आजचा दर ज्वेलर्सकडे तपासा. दुसरीकडे कास पठारावर कमी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे फुलांचा बहर ओसरला आहे, 60 हजार पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

23.ऑगस्ट 2026,NEET लिस्ट आज, अंतराळ दिन आज, अलीबाबा AI गुंतवणूक, लोकशोधक न्यूज

राष्ट्रीय सेवा साधना आयकॉन पुरस्काराने डॉ. विजय मोरे यांचा सन्मान | राज्यस्तरीय काव्य संमेलन पनवेल | LOKSHODHAK NEWS PRESS