विद्यार्थी दिन ७ नोव्हेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा इतिहास | लोकशोधक न्यूज
इतिहास - ७ नोव्हेंबर १९०० - तो एक दिवस ज्याने इतिहास बदलला
७ नोव्हेंबर १९०० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील 'गव्हर्नमेंट हायस्कूल' मध्ये (सध्याचे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल) इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता. त्यांच्या शाळेच्या रजिस्टरमध्ये क्रमांक १९१४ वर 'भिवा रामजी आंबेडकर' अशी सही आहे. त्या एका सहीने भारताच्या इतिहासाची दिशा बदलली.
📍 सातारा | १९००घोषणा - २७ ऑक्टोबर २०१७ - विद्यार्थी दिन अधिकृत
२७ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक ७ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे 'विद्यार्थी दिन' म्हणून घोषित करण्यात आला. शिक्षण हेच मानवी जीवनातील उन्नतीचे आणि परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, वकृत्व आणि समताविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.
📍 महाराष्ट्र शासन | शिक्षण विभागबाबासाहेब - म्हणजे शिक्षणासाठी केलेला त्याग
बाबासाहेबांनी लहानपणी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतले. पाणी प्यायला सुद्धा त्यांना मज्जाव होता. पण त्यांनी हार मानली नाही. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्याकडे 32 पेक्षा जास्त पदव्या होत्या, 9 भाषा येत होत्या. ते भारतातील सर्वात जास्त शिकलेले महामानव होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर