II बलिप्रतिपदा अर्थात पाडवा II | इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो | डॉ. विजय मोरे
लोकशोधक न्यूज प्रेस |संपादक: रविंद्र सपुत्रे
इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो !
बलिप्रतिपदा अर्थात पाडवा हा दीपावलीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा सण त्याग, दानशूरता, नात्यांमधील जिव्हाळा आणि नव्या समृद्धीची सुरुवात करून देणारा सण आहे.
व्यापारी लोक बलिप्रतिपदेला आपल्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. आपल्या वह्यांचे पूजन करतात. पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणूनही या दिवसाकडे पहिले जाते.
दानशूर राजा बळी यांच्या अत्यंत दानशूर, सत्यवचन याचे प्रतीक म्हणून या दिवसाला महत्व आहे. "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी प्रचलित म्हण बोलली जाते.
🌾 ग्रामीण भागातील परंपरा
ग्रामीण भागात शेतकरी पहाटे उठून आपल्या शेताच्या बांधावर जातात. तिथे मातीचा किंवा शेणाचा बळीराजा तयार करून त्याची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार 'बळी राजा' हा अतिशय दानशूर, प्रजाहितपर आणि न्यायप्रिय राजा होता.
🌧️ शेतकरी आजही संघर्षात - पण शासन पाठीशी
शेतकरी हा अन्नदाता असला तरी निसर्गाचे लहरीपण, मालाला योग्य भाव न मिळणे आणि आर्थिक अडचणींमुळे तो आजही संघर्ष करत आहे. त्यातच यावर्षी पाऊस कमी यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, यामुळे सध्या शेतकरी हैराण आहे. परंतु अशा या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध मदत व सवलती जाहीर केल्या आहेत. ही बाब निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारी आkहे.
🙏💐 हार्दिक शुभेच्छा 💐🙏
सर्वांना आजच्या बली प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Comments
Post a Comment